भुसावळ : शहरात कोरोनाच्या काळात जिवाची बाजी लावून जनसामन्यांना मदतीचा हात देणार्या कोरोना योध्दांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नगरसेवक, सफाई कर्मचारी, महिला बचत गट प्रतिनिधी, स्मशानभुमी कर्मचारी, पत्रकार आदींना कोरोना काळात केलेल्या कामाची पावती म्हणून पालिकेच्या लोकार्पण सोहळ्याात या कोरोना योध्दांना गौरविण्यात आला.

*सन्मानार्थी*शहरातील सतारे भागातील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याच्या नुतनीकरणाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते झाला. या कार्य्रक्रमात पालिका प्रशासनाकडून कोरोना काळात उल्लेखनीय काम करणार्या कोरोना योध्दांचा पालिका प्रशासनाकडून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पालिकेच्या मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर, डॉ. तौसिफ खान, डॉ. आर्शिया खान, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, आरोग्य निरीक्षक वसंत राठोड, सफाई कर्मचारी महेश चव्हाण, पाालिकेचे स्वच्छतादूत रणजीतसिंग राजपूत, नगरसेवक निर्मल कोठारी, शे. शरिफ शे. हसन, स्मशानभुमीतील सेवक अरुण रंधे, अंजूम पठाण, वैद्य रघूनाथ सोनवणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, छायाचित्रकार कमलेश चौधरी, सुनीता विनंते आदी कोरोना योध्दांचा गौरव करण्यात आला.


