नगरसेवक पिंटू कोठारीं यांच्या प्रयत्नाना यश :आयटीआयच्या विद्यार्थ्यांना शहरातच परीक्षा केंद्र उपलब्ध करुन दिले :

भुसावळ : औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शहराबाहेरील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. सद्यस्थितीत रेल्वे आणि बससेवा बंद आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना बाहेरील शहरात परीक्षा देण्यासाठी जाण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. आयटीआय प्रशासनाने दखल घेत भुसावळ शहरातच परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

शहरातील आयटीआयमध्ये गोरगरीब विद्यार्थी तंत्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. आता या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ घातली आहे. मात्र, शहरात इतरही केंद्र उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात परीक्षा केंद्र देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. या प्रकरणी समाजसेवक आणि नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी हे तात्काळ विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी पुढे सरसावले आणि विद्यार्थ्यांची परीक्षा योग्य ठिकाणी म्हणजे जवळच्या केंद्रावर झाली. दरम्यान वेगवेगळ्या तालुक्यात परीक्षा होणार होती. तसे परीक्षा केंद्रही जाहीर झाले होते. समाजसेवक आणि शिक्षणप्रेमी पिंटू कोठारी यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आंदोलनाचा पावित्रा घेतला. आधीच बससेवा गेल्या एक-दीड महिन्यांपासून बंद आहेत, त्यामुळे परीक्षार्थी यांचे संबंधित केंद्रावर जाणे कसे शक्य आहे? याबद्दलही मोठया प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला. श्री.कोठारी यांनी प्रसारमाध्यमांकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल नाराजी व्यक्त केली. भुसावळ तालुक्यात एकूण 5 ते 6 आयटीआय आहेत. त्‍यामध्ये 500 ते 600 प्रशिक्षणार्थी आहेत. या विरोधात आम्ही निवेदन देवुन समस्या मांडली, असेही कोठारी यांनी सांगितले. जळगावमध्ये प्रशिक्षणार्थी आंदोलन आणि त्यांचे हॉल तिकीट्सही जाळून टाकण्यात आले. केंद्र बदलून कुऱ्हा आदर्श आयटीआय येथे देण्यात आले आहे, तरी आता बहुतांश प्रशिक्षणयार्थीची सोय झाली आहे. अगदी एक दिवसात न्याय मिळवून दिल्याबदल विद्यार्थी आणि पालकवर्ग पिंटू कोठारी यांचे आभार मानले आहे