रावेरात एक कोटींचे ब्राउन शुगर जप्त : महिलेस अटक : जळगाव गुन्हे शाखेच्या कारवाईचे कौतुक : जिल्ह्यात प्रथमच मोठी कारवाई :

रावेर : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक रावेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधीं किंमत असलेले तब्बल अर्धा किलो ब्राउन शुगर रावेरातून जप्त केल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी संशयीत म्हणून अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्‍हाणपूर) या महिलेला अटक करण्यात आली.आहे
प्रतिबंधीत हेरॉईन महिलेने सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी मनसौर, मध्यप्रदेश) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात प्रथमच हेरॉईन इतक्या मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्याने अवैधरीत्या गांजा, ब्राऊन शुगर व हेरॉईनची वाहतूक करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, फैजपूर पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, रावेर निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक निरीक्षक योगीता नारखेडे, रावेरचे सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक, रावेरचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे, एएसआय युनूस शेख ईब्राहीम, हवालदार मनोहर रघुनाथ शिंदे, हवालदार सुनील पंडीत दामोदरे, हवालदार लक्ष्मण अरुण पाटील, किशोर ममराज राठोड, रणजीत अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, ईश्वर पंडीत पाटील, अभिलाषा मुरलीधर मनोरे, योगीता संजय पाचपांडे, रमेश भरत जाधव, भारत शांत्ताराम पाटील, विजु फत्तु जावरे, सुरेश आनंदा मेढे, प्रमोद सुभाष पाटील, सचिन रघुनाथ घुगे आदींच्या पथकाने केली. अलीकडच्या काळातील अंमली पदार्थ मिळण्याची ही सर्वात मोठी घटना असून याचे धागेदोरे राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी जुळले असल्याची शक्यता देखील असल्यामुळे ही कारवाई अतिशय महत्वाची मानली जात आहे.