आंतर महाविद्यालयीन कब्बडी स्पर्धेत भुसावळातील भोळे महाविद्यालयाचे यश –

भुसावळ प्रतिनिधि – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन कबड्डी (पुरुष) स्पर्धा 8 डिसेंबर 2021 रोजी अ‍ॅड.एस.ए.बाहेती कॉलेज, जळगाव येथे झाल्या. या स्पर्धेत दा.दे.ना.भोळे महाविद्यालयाने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरणगाव संघावर 41 गुणांनी विजय मिळविला. सेमी फायनलमध्ये एम.जे.महाविद्यालय जळगावशी ततटीचा सामना झाला. शेवटच्या मिनिटापर्यत सामना बरोबरीत असताना निसटता पराभव झाला. त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी पीओ.नाहाटा महाविद्यालय विरुद्ध भोळे महाविद्यालयाने 07 गुणांनी विजय मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत प्रथमेश विजय पाटील, मनीष विजय निकम, प्रसाद विलास पवार, भूषण लक्ष्मण बैसाणे, बुद्धभूषण राजेश सपकाळे, मनीष कडू अहिरे, यश अनिल चौधरी, जीवन प्रभाकर न्याहळदे, रीतेश किशोर भोई, साहिल संघरत्न पगारे, इशांत हेमराज चौधरी, मंगेश अशोक कुंभार यांनी उत्कृष्ट कामगिरी करून विजय संपादन केला. यशस्वी खेळाडूंचे सिनेट व व्यवस्थापन परीषद सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी सत्कार केला. यावेळी प्रा.डॉ.संजय डी.चौधरी, प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण उपस्थित होते. यशस्वी खेळाडू प्राचार्य, क्रीडा समिती सदस्य, प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना शारीरीक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.