भुसावळ – तामिळनाडू कुन्नर येथिल हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले जनरल बिपिन रावत ,त्यांच्या पत्नी मधुलिका व इतर अकरा वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
येथील जामनेर रोडवरील नाहटा चौफुली जवळील वीर जवान शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारका जवळ या अपघातात प्राण गमावलेल्या सर्व वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली शहरातील गोसेवा परिवार युवा वर्ग व विविध संस्थाचे पदाधिकारी यांनी या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सैन्यदल सीमेवर तैनात आहेत म्हणूनच आपण सुरक्षित आहोत ह्या भावनेने वीर जवान अमर रहे ,वंदे मातरम भारत ,माता की जय या घोषणा देवून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी गोसेवा परिवाराचे रोहित महाले , सखी श्रावणी मंचाच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई नेवे, जनजाती सुरक्षा मंचाच्या प्रांत सदस्या ॲड. जास्वंदीताई भंडारी, ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या अध्यक्षा पत्रकार उज्वलाताई बागुल, चेतन पवार, वंदनाताई झांबरे, अनिकेत साळी,भुषण कोळी, लोकेश लोहार समस्त बांधव व भगिनींची उपस्थिती होती.



