शिवसेनेचे सुरेश राणे घेणार तालुक्याचा आढावा भुसावळ विधानसभेच्या नवीन संपर्क प्रमुखांचा १४-१५ रोजी तालुका दौरा…..


भुसावळ – भुुसावळ विधानसभेचे नवीन संपर्क प्रमुख सुरेश राणे तालुका दौऱ्यावर येत असून दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२१ रोजी भुसावळ शहर, वरणगाव शहर आणि तालुक्याचा आढावा ते घेणार आहेत.

आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग, गट आणि गण निहाय संपर्क दौरा करून ते शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वा. भुसावळ शहर उत्तर विभाग, दुपारी १ वा साकेगाव कंडारी आणि कुऱ्हा वराडसीम जिल्हा परिषद गटात ग्रामीण संपर्क दौरा, दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वा. भुसावळ दक्षिण विभाग व दुपारी १.०० वा, वरणगाव शहर व हतनूर तळवेल जिल्हा परिषद गटाचा संपर्क दौरा जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. उत्तर व दक्षिण विभाग, जिल्हा परिषद गट यातील शिवसेना तसेच सर्व अंगीकृत संघटनेच्या आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी आप-आपल्या विभागात होणाऱ्या दौऱ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांनी केले आहे.