भुसावळ – तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनातर्फे व गोदावरी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर, श्रमिक कार्ड नोंदणी शिबिर मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या युवकांना क्रिकेटचे किट वाटप तसेच ज्या परिवारातील महिला व पुरुष दगावले असेल अशा परिवारातील घटकांची नोंदणी आदी उपक्रम व्हिडिओ स्मार्ट विलेज ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय तसेच वार्ड क्रमांक सहा येथे संपन्न झाले . त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात आमदार संजय सावकारे यांना मानाचा फेटा बांधून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना सर्व ग्रामस्थांनी तसेच ग्रामपंचायत कमिटीने व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन दिलीपसिंग पाटील उपसरपंच आनंद ठाकरे माजी सरपंच सुरेश पाटील भारतीय जनता पार्टीचे युवक उपाध्यक्ष सचिन सपकाळे ग्रामपंचायत सदस्य भूषणसिंग राजपूत कुंदन कोळी सुभाष सोनवणे गणेश कोळी अनिल सोनवाल राजेंद्र बाबुराव पाटील रवींद्र त्र्यंबक पाटील दिगंबर फलक गोमा मराठे सचिन पाटील
मॉर्निंग सीसी ग्रुप सन्माननीय कॅप्टन प्रमोद चव्हाण नितीन दादा पवन भाऊ सचिन भाऊ व सर्व युवा वर्ग खेळाडू अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य सेविका आशा वर्कर सन्माननीय ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती



