प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ;

भुसावळ – येथील प्रतिष्ठा महिला मंडळ तर्फे भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव येथे मुलांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले .
भुसावळ येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ अवनी ढाके यांनी मुलांची आरोग्य तपासणी केली.तसेच पालकांना मुलांच्या आरोग्या संबधी मार्गदर्शन केले.कमी वजनाची व अति तीव्र कमी वजना च्या 44 मुलांना मंडळा तर्फे आवश्यक असे प्रोटीन पावडर,कैल्शियम सिरप व इतर औषध सोबत पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ वंदना उन्हाळे,तर माजी नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेवक गणेश धनगर, प्रशांत पाटील,ऍड जंजाळे,श्री सौ श्यामल झांबरे जळगांव जिल्हा दुध संघाच्या संचालिका ,कठोरा गावाच्या सरपंच सौ रोहिनीताई पाटील,नगरसेविका सौ वैशाली देशमुख,मालती मेढे,सौ भाग्यश्री धनगर,सौ प्रणिता पाटील( शहर अध्यक्ष बीजेपी),मंडळाच्या सचिव स लताताई सोनवणे,सौ श्रध्दा चौधरी,सौ लक्ष्मी ताई बावस्कर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे यांनी केले. रेखा गायकवाड -सी डी पी ओ यांनी मार्गदर्शन तर मेढे सरांनी सूत्रसंचालन केले.सौ जयश्री जोशी दवे -पर्यवेक्षिका यांनी आभार प्रदर्शन केले.
अनुपमा बोरीकर,संध्या रोझतकर,शोभा जाधव यांनी कार्यक्रम नियोजन केले व सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उत्तम सहकार्य केले.