कोरोना काळातही भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची बहुराष्ट्रीय उद्योगांमध्ये निवड :

भुसावळ – व्यावसायिक शिक्षणाचा प्रमुख हेतु हा उत्कृष्ट नौकरी मिळवणे हा असतो. येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक वर्षं २०२१-२०२२ मधील चतुर्थ वर्षातील विध्यार्थी-विध्यर्थिंनिना शिकत असतांनाच बहुसंख्य कंपन्यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना नोकर्यांची दारे खुली करून दिली आहेत. महाविद्यालयाच्या साक्षी विनोद सपकाळे-कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग-टीसीएस, सोहेल हमीद कच्छी- कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग-व्हाइट हॅट जूनियर, आकाश यादव- कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग-टीसीएस, वेदांत सचिन पाटील-मेकॅनिकल इंजीनीरिंग-विप्रो, सचिन नन्नावरे- मेकॅनिकल इंजीनीरिंग-टाटा टेकनोलोजी, गिरीश पाटील-इलेक्ट्रिकल इंजीनीरिंग-हिताची, राहुल इंगळे-इलेक्ट्रिकल इंजीनीरिंग-रविंद्र एनर्जि लिमिटेड, प्रवीण लोखंडे-सिविल इंजीनीरिंग-टाटा कल्संटिंग एंगींनीर्र्स लिमिटेड, अतुल एस मापारी सिविल इंजीनीरिंग-टाटा कल्संटिंग एंगींनीर्र्स लिमिटेड, मंगेश भालेराव- सिविल इंजीनीरिंग-टाटा कल्संटिंग एंगींनीर्र्स लिमिटेड, प्रमोद चौहाण-सिविल इंजीनीरिंग-अल्ट्राटेक सीमेंट अश्या विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विश्वास दाखवत त्यांना आपल्या जगभरातील विविध ठिकाणी सामावून घेतले ही अभिमानाची बाब आहे.
“आमच्या महाविद्यालाच्या दूरगामी शैक्षणिक धोरणांतर्गत केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर आधुनिक उद्योगांच्या अपेक्षा आणि तंत्रज्ञान बदल याकडे बारीक लक्ष पुरवत अष्टपैलू अभियंता घडवण्याकडे आमचा कल असतो आणि ह्याच विचारांचा परिपाक म्हणजे आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मनुष्य बळावर औद्योगिक क्षेत्राने दाखवलेला सार्थ विश्वास” असे प्रतिपादन ह्या प्रसंगी प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी केले.
सदर उपक्रमासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर राममोहन अग्रवाल, डॉ.श्रीकांत चौधरी, गजानन पाटील, जयेश महाजन, गिरीश सोनवणे, डॉ.नीता नेमाडे, मनीष माटा, गौरव टेंभुर्णीकर, डॉ. वाय.जी. परदेशी, सचिन हरीमकर, अभिजीत इंगळे यांनी मेहनत घेतली.
हिन्दी सेवा मंडळाच्या सचिव एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, पंकज संड विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.ए.पी.चौधरी, डॉ.डी.डी.पाटील यांनी ह्या उपक्रमाचे कोतूक केले.