पुणे -पुण्यामध्ये व ओमायक्रोनची घुसखोरी झाली असून महाराष्ट्रामध्ये आज सकाळपर्यंत फक्त एक रुग्ण आढळला होता. धारावी मध्ये आढळला होता. आता पिंपरीमध्ये सहा; तर पुण्यात एका रुग्णाने वाढ झाल्याने एका दिवसात महाराष्ट्र आठ वर पोहोचला आहे.

मुंबईत आलेला एक रुग्ण धारावी मध्ये आढळला होता. त्याला सौम्य लक्षणे आढळली आहेत, परंतु आता एकाच दिवसात महाराष्ट्रात आठ जण आढळून आल्याने व ओमायक्रॉनने महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्याची देखील चिंता वाढली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये सहा रुग्ण आढळले असून पुणे शहरात एक रुग्ण आढळला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील सहाजणांपैकी तीनजण नायजेरियातून आले असून इतर तिघांना लागण झाली आहे. ते या तिघांच्या संपर्कातील आहेत. नायजेरियातील लेबास शहरातून आलेली महिला तिच्या भावाला भेटण्यासाठी आली. यावेळी नातेवाईकांसह तिघेजण संपर्कात आल्याने तेही बाधित झाले आहेत.
एन सी एल च्या अहवालानुसार या तिघा जणांना ओमायक्रोन ची लागण झालेली आहे पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात हे रुग्ण असून सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान या बाधित महिलेच्या संपर्कातील 13 जणांची तपासणी करण्यात आल्यानंतर तिघेजण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे प्रशासनाने सतर्क होऊन या सर्वांची व ओमायक्रोन ची तपासणी केली. त्यामध्ये यातील काही जणांना व मायक्रोनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.


