जामनेर- तालुक्यातील गंगापूरी या गावात देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने तंट्यामामा भिल यांच्या बलिदान दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विनम्र अभिवादन करण्यात आले.
रॉबिनहूड व जनजाति समाजाचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे वीर शहीद तंट्यामामा भिल यांना अभिवादन करण्यासाठी गंगा पुरी येथील हिंदू भिल्लसमाज माता बांधव एकत्र आले. हा कार्यक्रम देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्हा च्या माध्यमातून घेण्यात आला.
दानशूर एकलव्य व तंट्यामामा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी तंट्यामामा भिल हे कोण होते व त्यांना रॉबिनहुड का म्हटले जायचे, थोडक्यात त्यांचे जीवन चरित्र व जनजाति आदिवासी बांधवांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कल्याण आश्रम कशी मदत करतो या विषयी मार्गदर्शन ॲड. जास्वंदी भंडारी यांनी केले. श्री काशीराम बारेला सरांनी इतर जनजाति क्रांतिवीरां विषयी माहिती देऊन या समाजाने शिक्षण घेतले पाहिजे असे प्रास्ताविकात म्हटले. श्री नारायण दादा कोळी यांनी सर्व समाजाने एकत्रित व संघटित राहिले तर विकास होऊन समाजाची प्रगती होईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्हा महिला प्रमुख ॲड चित्रा आचार्य , जिल्हा हितरक्षा प्रमुख ॲड निलेश भंडारी , जिल्हा संघटन मंत्री वीर सिंग वसावे, सदस्या सौ. सुनिता राणे, गारखेडे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्री माधव महाजन, ग्रामपंचायत सदस्य श्री बापू सोनवणे, सौ. मिनाबाई मोरे , अरुण बाळू पिंगळे व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री प्रतापसिंग मोरे, श्री नारायण कोळी ,सौ दंडवते मॅडम व गावकरी यांनी सहकार्य केले.



