वरणगाव माझं गाव माझं तीर्थक्षेत्र गावातील सर्व कामे निकृष्ट :

वरणगाव – माझं गाव माझं तीर्थक्षेत्र असा म्हणणारा नेवरगाव शहरात सर्व निकृष्ट दर्जाची कामे करून लाखो करोडचा मलिदा लाटला वरगावकरानच्या भावनांशी खेळून अनेक निकृष्ट दर्जाची कामे केली त्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वरणगाव येथील आदर्श शाळेजवळील गणपती नगरचा रोडवरील ढापा ठरला सदर ढाप्याचे काम दोन वर्षापूर्वीच झाले असून आता तो पूर्णतः बसलेला आहे सदर ढापा मुख्य रस्त्यावर असून अनेक वाहनांची व नागरिकांची वर्दळ या रस्त्यावरून असते शेजारीच शाळा असल्याने अनेक विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करतात धापा तुटलेला असल्याने अनेक लहान-मोठे अपघात या ठिकाणी झालेले आहेत. या बाबतीत येथील रहिवाशांनी आपली तक्रार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्याने त्यांनी तिथे जाऊन भेट दिली असता नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या व रस्त्याचे तसेच गटारीचे काम देखील निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने ढापा तुटलेला आहे अनेक वेळा तक्रारी करून देखील सदर काम झालेले नाही दुरुस्ती करणे गरजेचे आहे असे नागरिकांनी यावेळी त्या ठिकाणी गेले असता सांगितले
दरम्यान सदरचा ढापा दुरुस्त करणे बाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी जागेवरच आश्वासन दिले व दोन दिवसात काम सुरू करून तीस फूट लांबीचा ढापा स्वखर्चातून करून देण्याचे आश्वासन दिले प्रसंगी तेथील नागरिकांनी या परिसरातील सर्व ढापे अशाच पद्धतीने बनवले गेले असल्याचे सांगितले व त्यातील बरेच तुटलेले असून काही तुटण्याच्या मार्गावर आहेत तरी या बाबतीत प्रशासनाने त्वरित लक्ष घालून सदर कामा दुरुस्ती करावी व निकृष्ट काम करणारे करणारे ठेकेदार विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी त्याला काड्या यादीत टाकावे अशी मागणी यावेळी संबंधित सर्व नागरिकांनी केली यावेळी सचिन सरोदे , सुभाष पाटील , रामा बोंडे ,शैलेंद्र बोरोले , भंगाळे आप्पा यांच्यासह संतोष रेडकर ,कैलास पाटील, इथे सर ,अतुल पाटील ,संतोष माळी , राजेंद्र पर्से ,सागर वाघ ,सागर लोंढे , अशोक ढाकणे , भारंबे , धांडे , पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे ,तसेच गणपती नगर , जगदंबा नगर , सरस्वती नगर येथील नागरिक उपस्थित होते .