जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर – उपाध्यक्षपदासाठी शामकांत सोनवणे यांना संधी : बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब :

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांची निवड करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अखेर गुलाबराव देवकरांना अध्यक्षपदाची संधी
जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीच्या संचालकांनी शुक्रवारी बैठक झाली. यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चीत करण्यात आल्याची माहिती दिली तर शिवसेनेतर्फे उपाध्यक्षपदासाठी शामकांत सोनवणे यांचे नाव निश्चीत करण्यात आले. शुक्रवारी दुपारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत गुलाबराव देवकर आणि अमोल पाटील हे अनुक्रम अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार असून त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देवकर आणि पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकार्‍यांनी स्वागत केले आहे.

सुरूवातीची तीन वर्ष राष्ट्रवादीला अध्यक्षपद
जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात झाली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सत्ता वाटपाच्या सूत्राची माहिती देताना पहिले तीन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळणार असून नंतरची दोन वर्षे शिवसेनेला अध्यक्षपद मिळणार असल्याचे सांगितले शिवाय पहिले दोन वर्ष काँग्रेसला, नंतरची दोन वर्षे शिवसेनेला तर एक वर्ष राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळणार आहे. या अनुषंगाने शुक्रवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले यांनी हाविकास आघाडी निवडणुकीपूर्वी जशी एकत्र होती, तशीच निवडणुकीनंतरही राहणार असल्याचे सुतोवाच केले होते.