भारत गौरव ट्रेन” पर्यटन सर्किट ट्रेन्स सुरू :

भारतीय रेल्वेने संकल्पना आधारीत “भारत गौरव ट्रेन” पर्यटन सर्किट ट्रेन्स सुरू केली

भारतीय रेल्वेने दि. २३.११.२०२१ पासून “भारत गौरव ट्रेन्स” सुरू केल्या आहेत. वैयक्तिक, भागीदारी फर्म, कंपनी, सोसायटी, ट्रस्ट, जॉइंट व्हेंचर, कंसोर्टियम, सरकारी एजन्सीसह इच्छुक टूर ऑपरेटर www.indianrailways.gov.in या वेबसाइटवर “भारत गौरव ट्रेन्स” अंतर्गत नोंदणी करू शकतात.

श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे म्हणाले, “भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे भारतातील आणि जगाच्या लोकांना दाखवण्यासाठी ‘भारत गौरव ट्रेन’ची संकल्पना तयार करण्यात आली आहे. यामुळे लोकांना किफायतशीर खर्चात विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.”

भारत गौरव ट्रेन्स योजनेची ठळक वैशिष्ट्ये

• रेल्वे बोर्डाकडून सेवा प्रदात्याला डब्बे वाटप केले जातील. नॉन-रेल्वे ग्राहक (NRC) योजनेअंतर्गत सेवा प्रदाता थेट रेल्वेच्या उत्पादन युनिटमधून डब्बे खरेदी करू शकतात. सेवा प्रदाता या योजनेअंतर्गत २ लगेज कम ब्रेक व्हॅनसह किमान १४ आणि कमाल २० डब्बे निवडू शकतात.
• सेवा प्रदात्यांना या गाड्यांसाठी व्यवसाय मॉडेल आणि दर ठरवण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यांना ट्रेन ब्रँडिंग अधिकार, नामकरण अधिकार आणि तृतीय पक्ष जाहिरात अधिकार देखील मिळतील.
• सेवा प्रदाते सुसज्ज नसलेले डब्यांची देखील निवड करू शकतात आणि त्यांच्या गरजेनुसार जसे की सूट किंवा सलून किंवा इतर कोणत्याही विशिष्ट पर्यटकांच्या गरजेनुसार सुसज्ज करू शकतात.
• सेवा प्रदात्याने दरवर्षी रेल्वेला ‘वापर अधिकार शुल्क’ भरावे लागेल, त्याचा प्रकार आणि त्याचे कोडल लाइफ यावर अवलंबून एक निश्चित दर ठरविण्यात आले आहे. तथापि, रेल्वेच्या स्वत:च्या उत्पादन युनिटमधून नॉन- रेल्वे ग्राहकाद्वारे डब्बे खरेदी केले असल्यास, सेवा प्रदात्याने ‘वापर अधिकार शुल्क’ भरण्याची गरज नसेल. पुनर्विकसित स्थानकासाठी स्टॅबलींग, वाहतूक आणि वापरकर्ता शुल्क यासाठी निश्चित (fixed) आणि बदलणारे (variable) इतर शुल्क लागू आहेत. रेकच्या मागणीसाठी परफॉर्मन्स बँक गॅरंटी स्वरूपात परत करण्यायोग्य सुरक्षा ठेव देखील लागू आहे.
• विभागीय रेल्वे स्तरावर मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी सेवा)-नोडल अधिकारी, मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक आणि मुख्य रोलिंग स्टॉक अभियंता (कोचिंग) यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. टुरिस्ट सर्किट ट्रेनच्या संचालनाशी संबंधित सर्व विनंत्या/समस्यांवर प्रक्रिया करण्यासाठी नोडल अधिकारी हा संपर्काचा एकल बिंदू असेल.
• या गाड्यांना मेल/एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा प्राधान्य दिले जाईल.