भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील स्टेट बँक आनंद नगर शाखेत शोभाबाई पोपट पगारे यांचे नावाने या क्रमांकाचे ३९१७३३०१२९६ खाते उघडण्यात आले.तसेच शोभा ब्युटी पार्लर नावाने व्यवसाय दाखवून बनावट कोटेशन लावण्यात आले आहे तसेच सर्व्हे नंबर २२/१A/१B शिरपूर कन्हाळा भुसावळ येथील इमला त्यावर दुमजली बांधकाम दाखवून स्टेट बँक आनंद नगर शाखेतून १८ लाख ६१ हजार ७९ रुपयांचे गृह कर्ज दिनांक १९ सप्टेंबर रोजी मंजूर करून घेण्यात आले आहे.याबदल्यात महिलेला १ लाख ६० हजार रुपये देण्यात आले.काही दिवसानंतर महिला स्टेट बँक आनंद नगर शाखेत १ लाख ६० हजार रुपयांचा किती हप्ता भरावा लागेल यांची चौकशी करण्यासाठी गेली असता महिलेच्या नावावर १८ लाख ६१ हजार ७९ रुपयांचे गृह कर्ज काढण्यात आल्याचे सांगितल्यानंतर महिलेला सदमा सहन न झाल्याने दिनांक २०/०५/२०२० रोजी प्राणज्योत मावळली.

सदर बनावट सौदेपावती खरेदीखत बनवून इमला नसलेले ठिकाण दाखवून बँकेची फसवणूक केल्याचे मुख्यालयात निर्दशनास आल्याने वरिष्ठ पातळीवरून भुसावळ स्टेट बँक आनंद नगर शाखेतील गृह कर्जाची चौकशी करण्याकामी पथक पाठविण्यात आले होते.या चौकशी दरम्यान पथक शिरपूर कन्हाळा येथील गुगल मॅपच्या आधारे सर्व्हे नंबर २२/१A/१B यांची चौकशी करून पाहणी केली असता या ठिकाणी कुठलेही बांधकाम करण्यात आलेले नाही याबाबत पथकाने स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती.तसेच बनावट सौदेपावती खरेदीसाठी बनवून तसेच इमला नसलेले ठिकाण दाखवून गृह कर्ज मंजूर करून घेण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला १९ आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार स्टेट बँक आनंद नगर शाखेचे नंदलाल बाबूलाल पाटील मॅनेजर नसून राजकीय नेता असून महिलेच्या घरी जाऊन शासकीय योजनेचे व पैशांचे अमिश दाखवून लाखो रुपये गिळणकृत करणारा अद्यापही राजकीय नेता मात्र भुसावळ शहरात मोकाट फिरत आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला सुद्धा माहिती असून मूग गिळून गप्प बसल्याची भूमिका घेण्यामागील नेमके कारण काय आहे ही एक संशोधनाची बाब आहे.पोलिस प्रशासनाला राजकीय दबाब तंत्राचा वापर करीत गृह कर्ज काढणार राजकीय नेता तर आणत नसल्याने पोलिस प्रशासन दिरंगाई तर करीत नसावी.पोलीस प्रशासनाने त्या राजकीय नेत्याला खाकी दाखवून अटक करून अन्यायग्रस्त परिवाराला न्याय मिळवून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या अन्यायग्रस्त परिवाराची पोलिस अधिकाऱ्यांनी भेट घेऊन सत्यते पर्यत पोहचले तर असे अनेक बनावट सौदापावती व खरेदीखत बनवून स्टेट बँक आनंद नगर शाखेत गृह कर्ज काढल्याचे अनेक प्रकरणे समोर आल्याशिवाय राहणार नाही.
*राहुल नगर भागात गरीब कुटूंबातील पत्राच्या घरात पती-पत्नी, दोन मुले तसेच बहीण असा एकत्र परिवार सोबत राहणारी शोभा पगारे ही महिला कुडा -कचरा वेचून तसेच कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देत आपल्या परिवाराचा उदर-निर्वाह करीत होती.मोठा मुलगा कॅन्सरने अचानक परिवाराला सोडून गेला*


