करोनाचा नवा अवतार… महाराष्ट्र सरकार अलर्ट… नवीन निर्बंध लागू ;

मुंबई: राज्य सरकारकडून आज नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच मॉल, सभागृह, सार्वजनिक कार्यक्रमांना लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

असे आहेत नियम –

-महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा 72 तास आधी केोलेला आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट बंधनकारक असणार आहे.

– रिक्षा, टॅक्सी, बस,कॅबमध्येही दोन डोस घेतलेलेच प्रवास करू शकणार आहेत.

– थिएटर, नाट्यगृह, लग्नाचे हॉल याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच उपस्थित राहता येणार

– मास्क न घालता फिरल्यास 500 रुपये दंड

-एखाद्या दुकानात ग्राहक मास्क न घातलेला आढळल्यास दुकानदाराला 10 हजार रुपयांचा दंड

– हिंदुस्थान न्यूझीलंड सामन्यासाठी 25 टक्के लोकांचीच उपस्थिती असणार आहे.

– राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 50 हजारांचा दंड

– राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 50 हजारांचा दंड

– टॅक्स व खासगी वाहनात मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. जर मास्क घातला नाही तर मास्क न घालणाऱ्याला 500 व वाहनचालकास 500 रुपये दंड