भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अथक प्रयत्नाने दोघा जोडप्यांच्या वैवाहिक जीवनात पुन्हा चैतन्य फुलले ; समुपदेशन कक्षाच्या चेअरमन आरती चौधरी यांचे कार्य कौतुकास्पद ;

भुसावळ :बाल दिना निमित्त दोघा बालकांना आईवडीलांचे प्रेम मिळावे ही तळमळ व जाणीव लक्षात घेवून दोघा विभक्त झालेल्या पती पत्नीस त्यांचे जिवनातील वादळ शमवत त्यांना एकत्र करून देण्यासाठी व दोन जोडप्यांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यात भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेला दि. 14 नोव्हेंबर रोजी यश आले, या माध्यमातून त्यांनी दोन मुलींची सासरी पाठवणी केली.
रविंद्र चुडामण पाटील मु. पो. कन्हाळे खुर्द व सौ. लक्ष्मी रविंद्र पाटील (माहेर-मु.पो.वितखेड,ता.रीसोड जिल्हा वाशीम) यांचे भांडण होऊन रागात आपल्या 4 वर्षांच्या मुलीला घेऊन लक्ष्मी माहेरी निघून आली ते परत नव-या कडे जायचे नाही या निश्चयानेच! पण भोरगाव लेवा पंचायत मधे आल्यावर सामुपदेशन कक्षात दोघांना समजावून भविष्याचा विचार करा असे समजावून सांगितले व दोघांनी आपापल्या चुका मान्य करून आनंदाने संसार करण्यासाठी तयार झाले.
तसेच कानळदा ( जि. जळगाव) येथिल किरण विजय राणे व बामणोद येथील कुंदा किरण राणे यांच्या संसारात कुरबुरी होऊन कुंदा बामणोदला माहेरी निघून आली यांना देखील 6 वर्षे वयाचा मुलगा आहे.
भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेत आल्यावर कौन्सिलींग करून सासरी जाण्यासाठी कुंदाला प्रवृत्त केले व सासरी पाठवणी केली.
या मुलींना सासरी पाठवणी करताना संसारोपयोगी चार गोष्टी सांगून जणू काही आपल्याच मुलीची पाठवणी करतोय अशा भावनेने आम्ही मुलींना सासरी पाठवणी करतो असे समुपदेशन कक्षाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी सांगितले.
या प्रसंगी भोरगाव लेवा पंचायतचे अध्यक्ष अँड. प्रकाश पाटील, सचिव डाॅ. बाळू पाटील, सुहास चौधरी, सामुपदेशन कक्षाच्या चेअरमन आरती चौधरी, परीक्षित ब-हाटे, मंगला पाटील, शरद फेगडे, डिगंबर महाजन हजर होते.