भुसावळ – विद्यार्थी जीवनात आपले ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करणे गरजेचे आहे तसेच, “उठो जागो और तब तक मत रुको जब तक की लक्ष की प्राप्ती ना हो जाये .” असे प्रतिपादन डॉ. सुधाकर आगरकर प्रोफेसर अँड डिन व्ही. पी. एम. एस (अकॅडमी ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन अँड रिसर्च) ठाणे यांनी केले.
भारताची पहिली 82 दिवसांची गणित यात्रा ‘ रामानुज अमृत भारत गणित यात्रा 2021’ ऑल इंडिया रामानुज मॅथ क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आली. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला ही गणित यात्रा सुरू झाली. या यात्रेचा समारोप 22 डिसेंबरला महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी त्रिपुरा राज्यातील अगरतळा येथे होणार आहे. दरम्यान 82 दिवस चालणाऱ्या या यात्रेने 25 राज्यातील 75 शाळांमध्ये ही यात्रा भेटी दिल्या आहे.
महाराष्ट्रात ही यात्राने जळगाव जिल्ह्यात 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान काही शाळा व महाविद्यालय यांना भेट दिल्या.याअनुषंघाने दिनांक 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळी अध्ययन मेंडिकल कॉलेज व हॉस्पिटल व भुसावळ तापी व्हॅली यांच्या सौजन्याने ,आर्या फाउंडेशन चे अध्यक्ष उमेंन्द्र वाघचौरे व रोटरी तापी व्हॅलीचे प्रेसिडेंट संजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन पॅरा मेडिकल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या यात्रेचे आगमन झाले. याप्रसंगी गणिताच्या कठीण सूत्रांना सोप्या पद्धतीने कसे सोडवता येईल व ती सूत्रे कशी लक्षात ठेवता येईल याची सुंदर प्रात्यक्षिके गणितज्ञ डॉ. बी .एन. राव यांनी विद्यार्थ्यांना सांगून खिळवून ठेवले.
तसेच यावेळी संजय भटकर यांनी विद्यार्थी जीवनात येणाऱ्या अडचणींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरकणीच्या उपाध्यक्ष अंजुम खान व अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्या. सौ. मनीषा बाविस्कर यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन आर्या फाउंडेशन च्या संचालिका डॉ.वंदना वाघचौरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरकणीच्या अध्यक्षा सुवर्णा इंगळे व पौर्णिमा पाटील , तसेच संपुर्ण अध्ययन पॅरामेडिकल स्टुडंट्स व स्टाफ, नवजीवन व्यसन मुक्ती केंद्र स्टाफ महिला मंच सदस्य यांनी केले.



