भुसावळ – भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती येथील जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग व राजीव गांधी वाचनालय तसेच ग्रंथालय यांच्यावतीने
शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली
स्थानिक नसरवांजी फाईल राजीव गांधी वाचनालय येथे आयोजित कार्यक्रमात प्रारंभी
मुन्नवर खान, जिल्हा उपाध्यक्ष जे बी कोटेचा , यांचे हस्ते मौलाना आजाद यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून विनंम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी
शहर अध्यक्ष सलीम गवली,शहर सचीव हमीद शेख सर , डॉ नईम मझहर, विधानसभा सभा अध्यक्ष ईम्रान खान,यांनी पुष्पहार अर्पण करून विनंम्र अभिवादन केले .
या प्रसंगी महीला शहर अध्यक्ष यास्मीन बानो,शहर उपाध्यक्ष संजय खडसे,जानी गवली, यास्मीन कुरैशी, शमीम कुरैशी,शहर उपाध्यक्ष हमीदा गवली, सलीम पटेल, जकपाल सिंह गिल,फातमा मो यफीक,वअनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



