भुसावळात सरदार पटेल जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे गॅस वाटप..

.भुसावळ – येथील माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत ३०० गरीब कुटुंबीयांना गॅस वाटप करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त जुना सातारा येथील शिवसेना विभागीय कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, माजी आमदार दिलीप भोळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनावणे, माजी नगरसेवक अनिल भोळे, माजी तालुका प्रमुख निळकंठ फालक, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, निलेश महाजन, रेल कामगार सेना मंडल अध्यक्ष ललित मुथा, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, उपजिल्हा युवा अधिकारी प्रवीण पाटील, शहर युवाअधिकारी सुरज पाटील, शहर संघटक योगेश बागुल, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, उपशहरप्रमुख राकेश खरारे, सोनी ठाकूर, माजी नगरसेवक ऍड. नरेंद्र लोखंडे, ऍड. निर्मल दायमा, शाखाप्रमुख पिंटू भोई यांच्या प्रमुख उपस्थितीत १० नवीन गॅस वाटप करण्यात आले.