भुसावळ नजिक अवैध व बायोडिझेलची विक्री ; 7 लाख 37 हजारच्या मुद्देमालासह तीघा आरोपीस अटक ;


भुसावळ – भुसावळ-वरणगाव दरम्यान अवैधरीत्या बायोडिझेलची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन तिघांच्या मुसक्या आवळत 7 लाख 32 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
गेल्या 3 दिवसात सलग दूसरी कारवाई असल्याने अवैधरीत्या बायोडिझेल विकणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडालीआहे .
भुसावळ पुरवठा निरीक्षक विजय पुंडलीक पाटील, (वय 46)यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन
संशयीत आरोपी हितेश वासुदेव शर्मा, वय 24 वर्ष, रा. वरणगांव, ता भुसावळ, सिकंदरखान
ईस्माईलखान, वय 50 वर्ष, रा. मिल्लतनगर, भुसावळ. अबुजर शेख निसार शेख, वय 19
वर्ष, रा. वरणगांव ता. भुसावळ
हे तीघे दिनांक 31/10/2021 रोजी रात्री 21:29 वाजता एंट्री क्र.19 वर पिंप्री सेकम शिवारात, भुसावळ ते वरणगांव रोडलगत, निर्मल ढाब्याचे पाठीमागे पटांगणात सार्वजनीक जागी
बायो डिझेल व बायो डिझेल भरण्याचे साधन सामग्री त्यांचे जवळ जैवइंधन विक्रीचा कोणताही परवाना नसतांना गैर कायदा विनापास परवाना असा एकूण7.37,020/- रु. चा मुददेमाल त्यात बायो डिझेल व बायो डिझेल विक्री कामी लागणार साहीत्यंसामुग्री त्यांचे कब्जात बाळगून साठवणूक करुन चोरटी विक्री करतांना मिळून आले. याप्रकरणी प्रभारी पुरवठा निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून अटकेतील तिघांच्या ताब्यातून बायो डिझल विक्री व साठा करण्यासाठी लागणारे साहित्य, मिनी टॅंकर व डिझलने भरलेला ट्रक व डिझेल असा एकुण 7 लाख 37 हजार 20 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलिस उप अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक विलास शेंडे, सहा फौ. श्यामकुमार आत्माराम मोरे
सहा.पो.निरी.प्रकाश वानखेडे
पो.नि. किरणकुमार बकाले यांनी तयार केलेल्या पथकातील पो.नाईक रणजीत जाधव, किशोर राठोड, पो.कॉ. श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील तसेच भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी हे.कॉ. विठ्ठल फुसे, प्रेम सपकाळे, संजीव मेढे, आदींनी कारवाई केली .