भुसावळ – राष्ट्रहित जपणारं कणखर नेतृत्व म्हणजे सरदार वल्लभाई पटेल. दूरदृष्टी असलेले तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पंतप्रधान झाले असते, तर या देशाचा इतिहास काही वेगळाच लिहिला गेला असता. राजनैतिक दूरदर्शीपणा तून एकसंध राष्ट्र निर्मितीसाठी त्यांचे भरीव योगदान आहे. लेवा पाटीदार समाजाच्या मनात त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्यकर्तृत्व बद्दल एक वेगळाच आदर आहे.
असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा. उत्तम सुरवाडे यांनी आज येथे बोलताना केले. भुसावळ कला विज्ञान आणि पु ओं. नाहाटा वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्याN.S.S +2स्तर च्या युनिट तर्फे आयोजित केलेल्या आदरांजली च्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे. पर्यवेक्षक प्रा.शोभा तळेले यांच्या शुभहस्ते सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचं आयोजन आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ.भाग्यश्री भंगाळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.
पर्यवेक्षक प्रा.श्रीमती शोभा तळेले यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्व बद्दल गौरवोद्गार काढून त्यांच्या जीवनाचा धावता आढावा मनोगतातून घेतला. याप्रसंगी प्रा. शैलेश पाटील, प्रा.अमोल पालवे,प्रा महेश गोसावी ,प्रा जयंत बेंडाळे, प्रा तुषार पाटील, वैभव पाटील,प्रा.प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील,डॉ.बी एच बऱ्हाटे, डॉ. ए.डी.गोस्वामी, डॉ.एन.इ.भंगाळे, यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी NSS +2 स्तर मधील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्रा.महेश सरोदे, प्रा.एल.पी.टाक, प्रा.आर पी मसाने, प्रा.जे.डी.धांडे, प्रा . व्हि.डि सावकारे, कार्यालयीन अधिक्षक श्री.भगवान तायडे, श्री. सचिन पाटील, श्री.अतुल किनगे, श्री गोकुळ फालक, आदींचे सहकार्य लाभले



