भुसावळ -भारतरत्न, माजी उपपंतप्रधान तथा देशाचे माजी गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची
स्मार्ट विलेज ग्रामपंचायत प्रशासन साकेगाव येथे कार्यालयात जयंती उत्सव साजरा करण्यात आला
प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून जयंती साजरी करण्यात आली यावेळी माजी सरपंच अनिल पाटील उपसरपंच आनंद ठाकरे सरपंच पती विष्णू सोनवणे ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल सपकाळे कुंदन कोळी अजय चौधरी गजानन कोळी सागर सोनवाल पप्पू राजपूत गजानन पवार वीलास ठोके शकील पटेल धनराज भोई संतोष पाटील साबिर पटेल चंदू कोलते दिगंबर फलक सोपान फालक सह समाजबांधवांची उपस्थिती होती
प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल यांच्य स्टॅच्यू ऑफ युनिटी या जागतिक उंचीच्या पुतळा प्रमाणे स्मार्ट व्हिलेज साकेगाव हे नाव राज्य व देश पातळीवर उंचवायचे आहे त्यासाठी सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांनी संकल्प करून गावासाठी आपापल्या परीने योगदान द्यायचे आहे गाव स्वच्छ सुंदर राज्यस्तरीय मॉडेल स्मार्ट विलेज
निर्माण करायचे आहे असा संकल्प उपस्थित मान्यवरांनी घेतला त्यामुळे साकेगाव ग्रामपंचायत विकासात्मक छोटे शहर म्हणून लौकिक मिळवेल अशी आशा श्री ठाकरे यांनी व्यक्त केली



