दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सरदार पटेल जयंती साजरी :



भुसावळ – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्राचार्य डॉ आर पी फालक यांचे हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ आर पी फालक म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्य प्राप्ती नंतर देश एकसंध रहावा म्हणून सरदार पटेल यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे होते अत्यंत कणखरपणे काही भूमिका घेतल्यामुळे त्यांना लोहपुरुष असे संबोधले जाते. सरदार पटेल यांचे देशप्रेम, धैर्य, दूरदृष्टी, कणखरपणा निर्णय घेण्याची क्षमता आणि घेतलेले निर्णय राबवण्याची धमक या गुणांमुळे सरदार पटेल यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे ठरले.
कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ जी पी वाघळदे यांनी तर सूत्रंचालन अणि आभार प्रा डॉ दयाघन राणे केले.
या कार्यक्रमासाठी प्रा डॉ संजय चौधरी, प्रा डॉ आर बी ढाके, प्रकाश चौधरी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते