बाजारात वृद्ध महिलेच्या पर्सला ब्लेड मारून २० हजार लांबवीले ;

भुसावळ : दिवाळीची खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेच्या पर्सला ब्लेड मारून २० हजार रुपये चोरून नेल्याची घटना दि. २९ रोजी बाजारात घडली.

या प्रकाराणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरटयांविरुध्द्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, वरणगाव येथील रहिवासी तथा सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी बबन रघुनाथ सपकाळे हे दि. २९ रोजी पत्नी ललिता सपकाळे यांच्या सोबत दिवाळीच्या खरेदीसाठी भुसावळात आले होते. दरम्यान दुपारी ३ वाजता भुसावळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथून त्यांनी २० हजार ५०० रुपये विड्रॉल करत पैसे बॅगेत ठेवून ते बाजारात गेले असत ललिता सपकाळे याची बॅग स्टेट बँक ते मारीमाता मंदिर दरम्यान अज्ञात चोरटयांनी ब्लेडने फाडून २० हजार रुपये चोरून नेले. दरम्यान मारीमाता मंदिराजवर रांगोळी खरेदीचे पैसे देत असताना पैसे चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर सपकाळे दाम्पत्याने बाजारपेठपोलीस स्टेशन गाठता फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरुध्द्व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.