भुसावळ – येथील दादासाहेब देवीदास नामदेव भोळे महाविद्यालयात उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मिशन युवा स्वास्थ मोहिमे अंतर्गत दिनांक 27 ऑक्टोबर 2021 बुधवार रोजी सकाळी 09:30 वाजता covid-19 लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चा मेगा लसीकरण अभियानाचे उद्घाटन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ आर पी फालक, यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ कीर्ती फलटणकर आरोग्य अधिकारी न. पा. भुसावळ होत्या, डॉ संदीप जैन, प्रा डॉ जी पी वाघूळदे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, हे उपस्थित होते
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून महाविद्यालयातील 18 वर्ष वरील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कोविडं 19 चे लसीकरण प्राध्यानाने पूर्ण करण्यासाठी दि 25 ऑक्टोबर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मोहीम राबविली जाणार आहे
महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना करोना लसीकरणाचे दोन्हीं डोस पूर्ण करणे बंधनकारक आहे, प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी विद्यार्थी व पालक यांना लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे जेणे करून तिसऱ्या लाटची तीव्रता कमी होण्यासाठी मदत होईल
श्री राजेंद्र चौधरी श्री गोपाळ पाली नगरपरिषद कर्मचारी यांनी लसीकरण ठिकाणी भेट दिली
लसीकरण करणेसाठी आरोग्य कर्मचारी कु काजल मोरे, सौ .ज्योती पाटील कु रविना दांडवेकर, सौ तोषिता कोळी, सौ अनिता तायडे श्री जावेद मोहम्मद इंद्रिस यांनी मदत केली
सदर कार्यक्रम साठी प्रा डॉ डी एस राणे, प्रा निर्मला वानखेडे, प्रा माधुरी पाटील, प्रा डॉ आर बी ढाके, प्रा डॉ एस डी चौधरी, प्रा डॉ जे बी चव्हाण, प्रा दीपक जैस्वार, प्रा तबरेज खान, श्री प्रकाश सावळे, श्री विजय पाटील, सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.
असे प्रसिद्धी प्रमुख प्रा डॉ एस डी चौधरी यांनी कळविले आहे



