भुसावळ : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात वृद्धेचा जागीच मृत्यू झाला तर वृद्धेसोबतचा जावई जखमी झाला. हा अपघात मंगळवार, 26 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाणपुलावर झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या अपघातात सरस्वतीबाई मुरलीधर वाघोदे (75, जामनेर रोड, दत्त धाम, भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे जावई सुरेश भोळे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर सकाळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शहर पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.



