अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपीस अटक :

भुसावळ – शहरातील ओम पार्क,आर.एम एस.कॉलनी, शिरपूर कन्हाळा रोडवर येथील ४१ वर्षिय इसमाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार बाजार पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाली असून याप्रकरणी आरोपीस त्वरित अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिलेल्या फिर्यादीवरून गेल्या तीन वर्षापासून आरोपी भगवान लक्ष्मण सुरवाडे वय ४१ राहणार ओम पार्क, आर.एम एस.कॉलनी, शिरपूर कन्हाळा भुसावळ हा गेल्या ३ वर्षा पासून १६ वर्षिय अल्पवयीन मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करीत होता. झालेल्या घटनेची माहिती मुलीने सांगितल्यावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक २३/१०/२०२१ रोजी गुरुन ४३३/२०२१ भा द.वि कलम ३७६,(३),५०६ बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ चे कलम ६ नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत,सपोनि मंगेश गोंटला,पोना विकास सातदिवे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील,निलेश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव,गजानन वाघ,प्रशांत परदेशी,योगेश माळी,प्रशांत सोनार जावेद शहा,जाफर शेख अशांनी मिळून केली.पुढील गुन्ह्याचा तपास सपोनि मंगेश गोंटला व पोकॉ गजानन वाघ करीत आहे.