भुसावळ – पेट्रोलसह डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेला जगणे असह्य झाले आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ भुसावळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे केंद्र शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली तसेच प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आली.
केंद्र शासनाने वाढत्या महागाईवर तातडीने नियंत्रण मिळवून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

भुसावळात प्रांताधिकारी यांना निवेदन
भुसावळात देशातील इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रणजीत चावरीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष विशाल ठोके, तुषार चौधरी, विजय भंगाळे, सचिन पाटील, सिद्धार्थ पगारे, समीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, राजीव भोई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


