भुसावळ – येथील ब्रम्हा अॅग्रो फाऊंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र वकिल आघाडी कार्याध्ययक्ष (संघटक ) या पदावर अॅड अश्विनी डोलारे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे .
अॅड अश्विनी डोलारे यांचा सामजीक कार्याचा अनुभव पाहता व समाजिक कार्यासाठी
असणारी कटीबद्धता विचारात घेवुन 2021 ते 2024
या त्रैवार्षिक कार्यकाळासाठी
या पदावर संस्थापक अध्यक्ष
श्रीपाद (विवेक) कुंभेजकर , प्रदेश अध्यक्ष श्रीकांत रामचंद्र दंडवते महासचिव
बापुसाहेब कुलकर्णी
यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद दवे यांचे नेतृत्वात १७ रोजी
नियुक्ती करण्यात आली असून नियुक्ती पत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरविन्यात आले आहे .

ब्रह्मा ॲग्रो फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांचे माध्यमातुन
समाज एकत्रीकरण करणे व त्यामधुन सामाजिक उन्नती व समाजाभिमुख विकास कामे करणे व तसेच सामाजिक
समस्या सोडविणे हे संस्थेचे उद्दीष्ट व प्रयत्न पूर्णत्वाची जबाबदारी डोलारे यांचेवर सोपविन्यात आली असून या सेवाभावी कार्यास संपुर्ण ताकदिने साथ देवून तळमळीने आपला सहभाग नोंदवुन संस्थेच्या कार्य करणार असल्याचा विश्वास अश्विनी डोलारे यांनी यावेळी दिला . याबद्दल संस्थेच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या . तसेच या निवडीबद्दल अश्विनी डोलारे यांचेवर समाजातील सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते , आप्तइष्ट व भूसावळ बार असोसिएशन तर्फे शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .


