मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात; वाहने धडकली : तिघांचा जागीच मृत्यू ;


खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर सहा वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानंतर तिघांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला तर या अपघातात दोघे जमखी झाले. जखमींवर खोपोली रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. टेम्पो चालक अक्रम आणि कारमधील इर्शाद सिद्दिकी (31. रा. बांद्रा पश्‍चिम) रोनक मोरदानी (27 रा. खार,मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.

एकमेकांवर आदळली वाहने
कोंबडी वाहून नेणार्‍या टेम्पोने भाजी वाहून नेणार्‍या टेम्पो ला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर भाजी वाहून नेणारा टेम्पो हा कारवर जोरदार धडकला. त्यानंतर कोंबडी वाहून नेणारा टेम्पो हा पुन्हा ट्रेलरला आणि दोन बसलाही धडकला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. जखमींना खोपोली नगर पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार मधील मृत व्यक्तींच्या मोबाईल वरून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला. या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. एक्सप्रेस वेवर किलोमिटर 39 येथे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे चालकाला अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.