यावल- देवगीरी कल्याण आश्रमातर्फे आरोग्य रक्षकाची कार्यशाळा संपन्न :

यावल – येथील देवगिरी कल्याण आश्रमाच्या कार्यालयात आदिवासी वस्तीवर नमेलेल्या सर्व आरोग्य रक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली.

   देवगिरी कल्याण आश्रम जनजाती समाजातील बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देऊन ॑तु मैं एक रक्त' ही भावना त्यांच्यात रुजविण्यासाठी कार्यशील आहे त्या अनुषंगाने आदीवासीवस्तीवर आरोग्य रक्षक हा प्रकल्प राबविला जातो त्या अंतर्गत संस्थेतर्फे आरोग्य रक्षक नेमलेले आहे जे त्यांच्या बांधवांना तात्काळ प्रथमोपचार लागत असेल तो देत असतात.

यावेळी आरोग्य रक्षकांना सर्दी, खोकला, ताप, ऍसिडिटी, उलटी अशा आजारावर गोळ्यांचे वाटप करण्यात आले तसेच दिवाळीनिमित्त धोतर व शर्ट पीस भेट म्हणून दिली.
कार्यक्रमाला कल्याण आश्रमाचे प्रांत उपाध्यक्ष श्री किशोर मोरे यांनी आरोग्य रक्षकांनी वस्तीवर कोणकोणते कार्य पाडावी व त्यांची जबाबदारी काय या विषयी मार्गदर्शन केले व 15 नोव्हेंबर रोजी क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त जनजाती गौरव दिवस पर्व एक महिना साजरा करावयाचे असल्याने त्याविषयी रचना व कार्यक्रम कसे असतील याविषयी मार्गदर्शन केले.ॲड. जास्वंदी भंडारी यांनी आधार कार्ड रेशन कार्ड याविषयी काही अडचणी असतील तर तृया कश्या सोडवावेत यांविषयी माहिती दिली व येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कल्याण आश्रम प्रयत्न करेल असे सांगितले.
यावेळी देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांत उपाध्यक्ष डॉ किशोर मोरे,प्रांत संघटन मंत्री विठ्ठल मैयकलवाड, जिल्हा सचिव काशीराम बारेला , जिल्हा महिला प्रमुख ॲड चित्रा आचार्य,सहप्रमुख ॲड जास्वंदी भंडारी, कोषाध्यक्ष ॲड जयश्री देशमुख, संघटक– वीरसिंग बारेला आणि रावेर ,यावल , मुक्ताईनगर तालुक्यातील आरोग्यरक्षक उपस्थित होते.