दिवाळी -छट सणांसाठी नागपूर – करमळी – मुंबई आणि पुणे – भगत की कोठी दरम्यान उत्सव विशेष गाडी;


भूसावळ (
दिवाळी -छट सणांसाठी होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे, नागपूर व करमळी -मुंबई तसेच पुणे व भगत की कोठी दरम्यान विशेष उत्सव ट्रेन चालविणार आहे.
त्यांचे पुढील प्रमाणे तपशील आहेत :
१) नागपूर-करमळी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष
01239 विशेष उत्सव ट्रेन दि. ३०.१०.२०२१ ते २०.११.२०२१ पर्यंत दर शनिवारी नागपूर येथून १५.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४.३० वाजता करमळी येथे पोहोचेल.
01240 विशेष उत्सव ट्रेन दि. ३१.१०.२०२१ ते २१.११.२०२१ पर्यंत दर रविवारी करमळी येथून २०.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
थांबे: वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
२) मुंबई- नागपूर विशेष अतिजलद साप्ताहिक
01247 विशेष अतिजलद ट्रेन दि. २९.१०.२०२१ ते १९.११.२०२१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दर शुक्रवारी २२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १३.१० वाजता पोहोचेल.

01248 विशेष अतिजलद ट्रेन दि. ३०.१०.२०२१ ते २०.११.२०२१ पर्यंत दर शनिवारी नागपूर येथून १७.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: कल्याण, इगतपुरी (फक्त 01248 साठी), नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना : १ प्रथम वातानुकूलीत, २ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
3) पुणे-भगत की कोठी साप्ताहिक विशेष
01249 विशेष दि. २२.१०.२०२१ ते १९.११.२०२१ पर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून २०.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.५५ वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल.
01250 साप्ताहिक विशेष दि. २३.१०.२०२१ ते २०.११.२०२१ पर्यंत भगत की कोठी येथून २२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.०५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, भिल्डी, धानेरा, राणीवाडा, मारवाड भीनमल, मोडरान, जालोर, मोकलसर, समाधारी आणि लुनी.
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण: पूर्णतः आरक्षित विशेष ट्रेन क्रमांक 01239, 01247, 01248 आणि 01249 साठीचे विशेष शुल्कासह बुकिंग दि.१८.१०.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल, जे बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानादरम्यान कोविड- 19 शी संबंधित एसओपी व सर्व निकषांचे पालन करतील.