प्रत्येकाने गावावर व देशावर प्रेम करावे -सरपंच पी टी शिंदे ;

भुसावळ -येणारी युवा पिढी या देशाचं भवितव्य असून प्रत्येकाने आपल्या गावावर व देशावर भरभरून प्रेम करावे तरच आपले गाव व देश लौकिक मिळवेल याचे प्रत्यक्ष उदाहरण स्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायत रानमाळ ग्रामपंचायत असल्याचे महाराष्ट्र शासनाचे वनश्री पुरस्कार प्राप्त सरपंच पी टी शिंदे यांनी साकेगाव येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले
खेड तालुक्यातील रानमळा गावाचा आज राज्यात व देशात शासनाने रानमळा पॅटर्न लागू केलेला असून रानमळा पॅटर्न चे प्रणेते पोपटराव तुकाराम शिंदे यांनी स्मार्ट विलेज ग्रामपंचायत साकेगाव येथे उपसरपंच आनंद ठाकरे यांच्या आग्रहास्तव भेट दिली तब्बल दोन तास त्यांनी ग्रामस्थ सरपंच कमिटीला मार्गदर्शन करताना सांगितले .

रानमळ गावाची स्थिती अशी होती की गावात कुठलीही सुविधा नसल्याने कुणीही मुलगी देण्यास तयार नव्हते मात्र शिक्षकी नोकरी करीत असताना गावचा सरपंच होन्याचा मान लाभला आणि चक्क नोकरी सोडून पूर्णवेळ ग्रामपंचायत प्रशासनाला दिला त्या ठिकाणी आज विविध प्रकारचे लाखो वृक्ष लागवड करून दाखविली आज गावात सर्व सुखसोयी संपन्नता निर्माण झालेली आहे देश-विदेशातून लोक गाव पाहायला येतात
महाराष्ट्र सरकारने व केंद्र सरकारने वृक्षलागवडीचा आदर्श पॅटर्न लक्षात घेतात पी टी शिंदे यांना वनश्री पुरस्कार देऊन गौरविले असून रानमाळ गावाच्या नावाने शासनाने दोन जीआर पारित केलेले आहेत हा गौरव मी व माझ्या सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने व शासनाची कुठलीही मदत न घेता समर्पित भूमिकेतून मिळविलेला गौरव आहे असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट करताना प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर मुलगी झाली तर झाडे लावा, मुलगा झाला त्याच्या नावाने झाड लावा, मुलीचे लग्न झाले त्यानिमित्ताने झाड लावा, सुनबाई घरात आली त्यानिमित्ताने झाड लावा, घरात बाळ जन्माला आल त्यानिमित्ताने झाडे लावा, कुणी वारल त्यांच्या स्मृतिनिमित्त झाडे लावा, असे विविध युक्त्या करून गावातील नागरिकांना झाडे जगविण्याचा छंद निर्माण केला आणि आज गाव स्वच्छ सुंदर विकसनशील हिरवेगार गाव निर्माण झालेले आहे त्याच पद्धतीने प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या घरासमोर झाडे जगवली फळझाडे लावली तर गावाचे नंदनवन होईल व गाव सुजलाम-सुफलाम निर्माण होईल त्याचबरोबर प्राणीमात्रावर देखील दया करा आपल्या घरासमोर पाण्याचे भांडे ठेवा त्यात आपल्या घरातील पोळीचे तुकडे अथवा उरलेले अन्नपदार्थ टाकून द्या घराच्या आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट होईल असे सांगताना त्यांनी उपस्थित महिलांना आपण अबला नसून नारी एक शक्तिपीठ आहे महिला पुरुषांपेक्षा अधिक ताकदीने काम करू शकतात असे त्यांनी यावेळी स्पष्ट करून महिलांनी राजकारणात सक्रिय व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक करताना इतक्या मोठ्या लोकवस्तीचे गाव आदर्श गाव निर्माण होणे सोपे नसून ग्रामपंचायत प्रशासनाचे कार्य गौरवास्पद आहे तसेच ग्रामपंचायत प्रशासनाचा राज्यस्तरीय मॉडेल व्हिलेज निर्मितीचा दृष्टिकोन निश्चित सफल होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कारण ग्रामपंचायत प्रशासन उत्कृष्ट सोयीसुविधा निर्माण करीत असून गावात स्वच्छता सह मूलभूत सुविधा निर्माण होत असल्या कारणास्तव गाव निश्चित राज्यस्तरीय लोकि मिळवेल अशा शुभेच्छा त्यांनी सरपंच ग्रामपंचायत कमिटीला दिल्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगिता सोनवणे भा ज पा चे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील उपसरपंच आनंद ठाकरे ग्रामविकास अधिकारी एसडी पाटील सुरेश पाटील युवक भाजपा तालुका उपाध्यक्ष सचिन सपकाळे विष्णू सोनवणे ग्रामपंचायत सदस्य पप्पू राजपूत कुंदन कोळी हिम्मत सोनवणे गजू कोळी गजानन पवार सागर सोनवणे ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग अंगणवाडी सेविका आरोग्य विभाग कर्मचारी शिक्षक वृंद आभार इं.गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जीआर चौधरी यांनी तर सूत्रसंचालन नेमाडे सर यांनी केले