भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात तीन
दिवसीय माहितीचा अधिकार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आज दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी च्या समारोप सत्रात ॲड. सुनील हंसराज पगारे ( जिल्हा सत्र न्यायालय,भुसावळ) यांचे “माहिती अधिकार कायदा, प्रक्रिया, पद्धती आणि अपिल” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. सदर
कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य
डॉ. बि. एच. बऱ्हाटे, प्रमुख वक्ते ॲड. सुनील पगारे, समितीचे चेअमन प्रा. अनिल हिवाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. सुनील पगारे यांनी प्रत्यक्ष जीवनातील अनेक उदाहरणे देऊन हा कायदा समजावून सांगितला. विद्यार्थीदशेतील अनेक समस्या माहितीच्या अधिकार कायद्याच्या मदतीने कश्या सोडवून घेता येतील, याचे दाखले त्यांनी दिले.
माहितीच्या अधिकारामुळे अधिकारी वर्गांची जबाबदारी अधोरेखित केली जाते. या कायद्याच्या मदतीने तरुणांनी दुर्बलांचआणि गरिबांच होणार शोषण थांबवाव असं आवाहन केले.
सदर कार्यक्रमास शहरातील नागरिक आणि परिसरातील इतर महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.अनिल हिवाळे आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरण वारके यांनी केले.
तीन दिवसीय कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. सौ. मीनाक्षी वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती सदस्य डॉ.आर. एस. नाडेकर, डॉ. किरण वारके, डॉ. ममताबेन पाटील.
प्रा. व्ही. ए. सोळुंके, डॉ. विलास महिरे, डॉ. सचिन कोलते यांनी परिश्रम घेतले.


