भुसावळ – उत्तर प्रदेश येथील ग्राम चित्तोनी येथे एका समाजवंâटकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबणा केल्याप्रकरणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियातर्फे निषेध करण्यात आला आहे. या घटनेबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा रिपार्इंतर्फे देण्यात आला.

उत्तरप्रदेश सरकार, केंद्र सरकार यांनी समाजकंटकावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास रिपार्इंतर्फे निर्दशने केले जाईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर रिपार्इं युवा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रवींद्र सपकाळे यांची स्वाक्षरी आहे


