भुसावळ : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकर्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवार, 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. भुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर भुसावळातील व्यापार्यांनी मात्र बंदला अल्प प्रतिसाद लाभला. महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी केवळ प्रशासनाला निवेदन दिले. बंदच्या अनुषंगाने भुसावळ शहर विभागात पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले होते. वरणगावातील हाणामारी वगळता बंद शांततेत पार पडला.
भुसावळातील मुख्य बाजारपेठेतील काही भागातील दुकाने दोन तास उशिराने उघडली गेली. तर वसंत टॉकीज भागात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्हाटे, काँग्रेसचे शहरप्रमुख रवींद्र निकम आदींसह कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करीत प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध करुन लखीपूर घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आल



