भुसावळ शहरासह परिसरातील मूक प्राण्यांवर होणारा अन्याय थांबवावा : गो-सेवा परिवार व भारतीय शाकाहार संघ यांच्या वतीने प्रांत कार्यालयात दिले निवेदन :

भुसावळ -मुक प्राण्यांवर आणि गोवंश वर होणारा अत्याचार व त्यांची होणारी चोरटी वाहतूक व तसेच त्यांच्या शरीराचे अवयवाची बेकायदेशिररित्या होणारी तस्करी थांबवावी व महाराष्ट्रात लागू असलेला गोवंश हत्या बंदीच्या कायदयाची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी यासाठी बुधवार रोजी प्रांत अधिकारी कार्यालयात भारतीय शाकाहार संघ व गोसेवा मित्रपरिवार व पर्यावरण प्रेमी यांच्याकडून नायब तहसीलदार मॅडम सविता नाथ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी यांची होती उपस्थिती

भारतीय शाकाहारी संघाचे जिल्हाध्यक्ष- चेतन जैन
गोसेवा परिवाराचे -रोहित महाले,अनिकेत साळी,चेतन पवार,गौरव साळी दुर्गेश झोपे आदि उपस्थित होते .