भुसावळ – जुना सातारा येथील शिवसेनेच्या विभागीय संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी अभियान राबविण्याची सुरुवात करण्यात आली आहे. या मतदार नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नोंदणी झालेल्या नवीन मतदारांना याप्रसंगी डिजिटल मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले.

शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक धांडे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, माजी तालुकाप्रमुख निळकंठ फालक, उपशहरप्रमुख राकेश खरारे, उपशहर संघटक सोनी ठाकूर, माजी नगरसेवक ऍड. नरेंद्र लोखंडे, ऍड. निर्मल दायमा, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, विभागप्रमुख अमोल पाटील, शांताराम बैलम उपस्थित होते.
निवडणूक आयोगातर्फे वारंवार मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येते. त्याला प्रतिसाद देत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले तरुण-तरुणी मोठ्या संख्येने नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावतात. मतदानाचा हक्क बजावता आला म्हणजे देशाचे सुजाण नागरिक असल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण होते. अनेक वेळा नवमतदारांचे मतसुद्धा एखाद्या निवडणुकीचे चित्र पालटून टाकते म्हणून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचा संकल्प शिवसेनेचा आहे असे आयोजक दीपक धांडे म्हणाले.


