भुुसावळ;- समाजातील सर्व थरातील करोना योद्ध्यांचा सत्कार शाल, मानपत्र व जळगाव येथील उडान या दिव्यांग शाळेच्या मुलांनी तयार केलेला फुलांचा बुके देउन सन्मान करण्यात आला.
ह्या प्रसंगी कुटुंब नायक रमेशदादा पाटील अध्यक्ष स्थानी होते, तसेच भुसावळ शाखेचे अध्यक्ष अँड प्रकाश पाटील, सचिव डाॅ. बाळू पाटील, श्री. सुहासदादा चौधरी, परीक्षित ब-हाटे, अजय भोळे, सौ आरती चौधरी,सौ मंगला पाटील,सौ जयश्री चौधरी, दिगंबर महाजन, शरद फेगडे, आर. जी. चौधरी, नाहटा काॅलेज चेअरमन महेश फालक आदि उपस्थित होते. अतिशय सुंदररीत्या आयोजित कार्यक्रमात सत्कारार्थी लोकांनी मनोगत व्यक्त केले व तळागाळात काम करणाऱ्यांपासून डॉक्टरांपर्यत करोना साठी जीवावर उदार होउन कार्य करणाऱ्यांचा सत्कार केला म्हणून आनंद व आभार व्यक्त केले.

समाज सेवक निर्मल कोठारी. डॉ. नि.तू.पाटील व अंगणवाडी सेविका चारुशीला माधव बेंडाळे यांनी मनोगते व्यक्त केले व आभार व्यक्त केले. सत्काराच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. आरती चौधरी यांनी केले, मनोगत सुहासदादा चौधरी यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ बाळू पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद धनगर, निलेश भोळे, मनोज जावळे, धनंजय पाटील प्रशांत तायडे, यांचेसह भुसावळ लेवा पंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले.


