साकेगाव येथे व्यायाम शाळा अत्याधुनिक साहित्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण :

भुसावळ – ग्रामपंचायत साकेगाव येथे व्यायाम शाळा अत्याधुनिक साहित्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आमदार संजय सावकारे यांनी साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन गावातील तरुणांसाठी जिल्हा क्रीडा विभागामार्फत पाच लक्ष रुपयाचा निधी व्यायाम शाळा साहित्य स्वरूपात मंजूर करून दिला व आज ४रोजी त्या साहित्याचे लोकार्पण संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील माजी सरपंच अनिल पाटील इं.गांधी विद्यालय चे चेअरमन दिलीपसिंग पाटील उपसरपंच आनंद ठाकरे सरपंचपती विष्णू सोनवणे भाजपा युवा तालुका उपाध्यक्ष सचिन सपकाळे माजी सरपंच सुरेश पाटील मा‌.उपसरपंच विठ्ठल पाटील ग्रामपंचायत सदस्य गणेश कोळी सागर सोनवाल कुंदन कोळी पप्पू राजपूत सुभाष सोनवणे गजानन पवार अशोक कोळी गजानन कोळी सह व्यायाम शाळा जिम प्रमुख सुरज सोपान पवार सह गावातील समस्त युवा वर्गाची उपस्थिती होती सर्वप्रथम आमदार संजय सावकारे यांचे समस्त पैलवान मंडळींनी फटाक्यांची आतिषबाजी करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले


त्याचबरोबर जिम मधील अत्याधुनिक मशीनींचे फित कापून लोकार्पण करण्यात आले
जिम मध्ये मॅटिंग ची कमी असून त्यासंदर्भात सावकारे पाठपुरावा करून मॅटिंग उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी साहित्य लोकार्पण प्रसंगी सांगितले त्याचबरोबर लागणारा अजून काही निधी असेल तर तो मार्चनंतर याठिकाणी वितरीत केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले अत्याधुनिक मशीन बघून संपूर्ण युवा वर्गामध्ये अतिउत्साह संचारलेला असून टेक्निकल बाबींची तपासणी करून व्यायाम करावा असा सल्ला देखील आमदार साहेबांनी उपस्थित युवकांना दिला त्या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत लवकरच आरशे, लाईट फिटिंग व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तरतूद करण्यात येणार आहे असे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने श्री ठाकरे यांनी स्पष्ट केले


आमदार संजय सावकारे यांनी व्यायाम शाळा साहित्य साठी पाच लक्ष रुपयांचे पत्र दिल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनासोबत गावातील क्रीडा महर्षी वासेफ भाई पटेल यांनी क्रीडा विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी परिश्रम घेतलेले आहे आजच्या उपक्रमात काही कारणास्तव त्यांना उपस्थित राहता आले नाही