भुसाावळ – येथे तालूका विद्या सेवा प्राधिकरण, भुसावळ व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पॅन इंडिया अवरनेसचे कार्यक्रम 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती भुसावळ एस.पी. डोरले भुसावळ न्यायालयातील मुख्य न्यायाधीश यांच्या हस्ते गांधीजींच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.

सदर उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी भुसावळ न्यायालयातील न्यायाधीश एस पी डोरले (अध्यक्ष), वि.जी. चौधरी दिवाणी न्यायाधीश ब स्तर, एम.पी बिहीर सहदिवाणी न्यायाधीश ब स्तर, डी.बी. डोमाळे दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर, डी. एम. शिंदे सहदिवाणी न्यायाधीश क स्तर, आर.आर.अहिर दुसऱ्या सह दवाणी न्यायाधीशत ब स्तर तसेच वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट तुषार पाटील, एडवोकेट डी.पी. मगर, एडवोकेट वी. एस. शेळके, विशेष सहाय्यक तालुका विधी सेवा समिती भुसावळचे के एस पिंगाने वरिष्ठ लिपिक, एस.आर. पाटील वरीष्ठ लिपिक, जे.एन.मानकर कनिष्ठ लिपिक आणि एस एस मणियार लॉ कॉलेज व उल्हास पाटील लॉ कॉलेजचे विद्यार्थी व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.


