भुसावळात ‘ड्राय डे’ ला झिंगाट तळीरामांची पोलिसांनी उतरवली ‘झिंग’ ;


भुसावळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ला ड्राय डे असतानाही शहरातील सार्वजनिक जागांवर मद्यपान करणार्‍या तब्बल 28 जणांवर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत या तळीरामांची चांगलीच झिंग उतरवली आहे .
बाजारपेठ पोलिसांनी 2 ऑक्टोबर रोजी शनिवारी सायंकाळी साडेसात ते साडेनऊ दरम्यान तीन टीम नियुक्त करीत याटिमच्या माध्यमातून सार्वजनिक जागी मद्यपान करणार्‍या तसेच शहरातील सर्व मोकळी मैदाने ,आदी ठिकाणी मद्यपान करणार्‍या तब्बल 28 तळीरामांना ताब्यात घेतले .या संशयीताना बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110 व 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे 13 वाहनांवर मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात आली.
सोमवारी या सर्वांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक नाईक व सहकार्‍यांनी मद्यपींवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मद्यपींच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली.