स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त उद्या अभिवादन सभा –

यावल : माजी खासदार व आमदार स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त रविवार, 3 रोजी स्व.हरीभाऊ जावळे संस्था मित्र परीवाराच्या वतीने भालोद येथे अभिवादन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम होईल. द्धद्धेय स्व.हरीभाऊ गेली अनेक वर्षे आपल्या परीसर व जिल्ह्याच्या सक्रिय राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. या परीसराचे ते अनेकवर्षं खासदार व आमदार म्हणून प्रतिनिधी राहिलेत. आपल्या प्रेमळ, शांत आणि निरपेक्ष स्वभावाने त्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन मैत्री व स्नेहाचे नाते निर्माण केले. कार्यकर्ते व सामान्य माणसांच्या पाठीशी ते नेहमीच उभे राहिले. शिक्षण ,सहकार ,सामाजिक अश्या विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय व पुढील पिढीला प्रेरणा देणारे आहे. आपला प्रत्येक वाढदिवस सामाजिक आणि शैक्षणिक अंगाने त्यांनी साजरा केला. याची नम्र जाणीव ठेवून श्रध्येय हरिभाऊ जावळे संस्था मित्र परीवाराने आयोजन केले आहे.