सर्व शक्ती सेनातर्फे कोरोंना योध्दांचा दिल्लीत सन्मान पुरस्कारात जिल्ह्यातील मान्यवरांचा समावेश : आज होणार वितरण


भुसावळ – सर्व शक्ती सेना सामाजिक संघठनेतर्फे कोरोना या महाभयंकर आजाराने संपुर्ण भारत देशात लाखो लोकांचे प्राण गेले.त्या काळामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात गोर गरीब होतकरू गरजवंतु यांना वेळोवेळी मदत केलेल्या विविध क्षेत्रातील अशा मान्यवरांचा कोरोना योध्दा सन्मान पुरस्कार देऊन गीता भवन दिल्ली येथे २ रोजी गौरविण्यात येणार आहे.


सन्मानित करण्यात येणार्‍यांध्ये माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आ. सुरेश भोळे, प्रा. संजय मोरे, माया मोरे, सुरेखा इंगळे, आरोग्य परिचारिका संगीता सोनवणे, सपना इंगळे, सुनंदा तायडे, पत्रकार सागर दुबे, पत्रकार आशिष पाटील, पत्रकार प्रवीण धुदले, संजय पाटील, सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किरण निजाई, कृष्णा सावळे, सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष किरण निजाई, योगेश अहिरे, राजेंद्र सपकाळे, सतीश गाढे, दिपक चौधरी, अभिजीत तायडे, कैलास दामोदरे, ईत्यादींनी सन्मानित करण्यात येणार आहे .
या कार्यक्रमाला सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष निरज सेठी, डॉ. सत्यनारायण जतिया, जितेंद्र सिंग शुंटी, भारतीय दलीत साहित्य अकादमी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर, दिलीप पांडे (मंत्री आप आदमी पार्टी), जय सुमनाक्षर सर्व शक्ती सेना राष्ट्रीय सचिव, प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय मोरे, किरण निजाई, देशभरातील राज्यांचेअध्यक्ष यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण २ ऑक्टोबर रोजी ११ वाजेला गीता भवन, कमला नगर, दिल्ली येथे होणार आहे तरी संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून या अधिवेशनाला ५० लोक आमंत्रित आहेत.
संटनेतर्फे कोरोना कार्यकाळात अनेकांन मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय मोरे हे भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत. त्यांनी कोरोना काळात उपेक्षितांना योग्य प्रकारे मदत केली आहे. स्वत: कोरोनाशी झुंज देवून ते कोरोना पिडीतांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत. राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी त्यांना प्रयत्न अविरत सुरुच आहे.