भुसावळ – शिवसेना रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर, सहसंपर्कप्रमूख माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हासंघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे यांच्या प्रमुख उपस्थित भुसावळ तालुका आढावा बैठक रविवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२१ रोजी रोजी दुपारी ४ वाजता. मोरया लौन्स, शिवपूर कन्हाळे रोड, भुसावळ येथे होणार आहे.

भुसावळ विधानसभा क्षेत्रातील पक्ष संघटना बळकटीसाठी तसेच येणाऱ्या वरणगाव, भुसावळ नगरपालिका, जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होणार असून उपस्थित मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
आजी माजी लोकप्रतिनिधी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, रेल कामगार सेना, शिक्षकसेना, ग्राहक संरक्षण कक्ष, अल्पसंख्याक आघाडी, दिव्यांग सेना, भारतीय विद्यार्थी सेना व शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी, विधानसभा क्षेत्र पदाधिकारी, उपतालुका संघटक, शहर संघटक, उपशहरप्रमुख, उपशहर संघटक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, गण प्रमुख, गटप्रमुख, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख व कार्यकर्ते यांनी बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनावणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, पप्पू बारसे, हिरामण पाटील, नितीन सोनवणे, समाधान पाटील, विकास पाटील, सुभाष पाटील, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, शहरप्रमुख निलेश महाजन यांनी केले आहे.


