भुसावळात भाजपातर्फे डॉक्टर, नर्स व आरोग्य सेविकांचा सन्मान –


भुसावळ – भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील महात्मा फुले आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेविका व स्टाफ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित लसवंतांना चहा-बिस्किटांचेही प्रसंगी वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, सतीश सपकाळे, लक्ष्मणराव सोयंके, अर्जुन खरारे, शैलजा पाटील, खुशाल जोशी, प्रवीण इखणकर, प्रशांत देवकर, शिशिर जावळे, शंकर शेळके, विशाल जंगले, जयंत माहुरकर, चंद्रशेखर पाटील, अनिरुद्ध कुलकर्णी, राहुल तायडे, चेतन बोरोले, दिनेश दोधानी, नंदकिशोर बडगुजर, अविनाश बर्‍हाटे, लखन रणधीर, अमित असोदेकर, प्रणव डोलारे, सोनु सचदेव, प्रशांत भट, सागर जाधव आदींची उपस्थिती होती.