वरणगाव – गेल्या दिड वर्षापासून कोरोनाच्या प्रार्दुर्भावामुळे शाळा बंद आहे. मात्र शिक्षण सुरू आहे. शहरी भागात व सदन पालक असलेल्या शाळांना अडचणी नाहीत. मात्र ग्रामीण भागात शेतकरी वर्ग तसेच आर्थीक परिस्थीती बेताची असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अॅन्ड्राईड मोबाईल नाही. असेल तर दोन विद्यार्थ्यांसाठी एकच मोबाईल यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षणे देणे अडचणीचे होत आहे. शाळा नाही म्हणुन विद्यार्थी देखील अभ्यासापासून दुर जात आहे. तसेच काही विद्यार्थी शाळा सोडून इतर दुसऱ्या शाळांमधे प्रवेश घेत आहे. यामुळे शाळेची विद्यार्थी संख्या कमी झाल्यास त्याचा परिणाम शिक्षक संख्येवर होणार आहे. यासाठी मुख्याध्यापकांनी आपल्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे व कोरोनाच्या याही परिस्थीतीत विद्यार्थी संख्या टिवकली पाहिजे असे प्रतिपादन मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यध्यक्ष जे.के.पाटील यांनी केले.

सुनसगांव ता.भुसावळ येथील दादासाहेब दामु पांडू पाटील माध्यमिक विद्यालय येथे भुसावल तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने मुख्याध्यापक सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी जिल्हा मुख्याध्याक संघाचे सहसचिव एस.पी. भिरूडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा महामंडळ राज्यध्यक्ष जे.के.पाटील, मुख्यध्यापक संघ विभागीय मंडळ सचिव गोपाळ पाटील, यावल मुख्याध्यापक तालुकाध्यक्ष जयंत चौधरी, रावेर मुख्याध्यापक तालुकाध्यक्ष आर.एल. चौधरी, सर्वोदय हायस्कूलचे मुख्याध्याक डी.पी.साळूंखे, माध्यमिक शिक्षक मडळ, सुनसगाव व्हा. चेअरमन हरी पाटील, सदस्य उल्हास भोळे, गणेश पाटील, सुदाम भोळे,शिक्षक परिषदेचे नेते एस.एस.अहिरे, ग.स.सोसोयटीचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे, नुतन प्राथमिक सोसायटीचे संचालक प्रदिप सोनवणे, एपीजेकेवायएस.चे महाराष्ट्र डायरेक्टर सुनिल वानखेडे, उषा नॅशनल चिल्ड्रन सायन्स सेंटरचे चेअरमन जीवन महाजन, विज्ञान मंडळाचे अनिल माळी, क्रीडा संघटनेचे राज्यउपाध्यक्ष डॉ.प्रदिप साखरे, कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव आदि उस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या प्राास्तविकात भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे यानी तालुक्याचा पदभार हाती घेतल्यानंतर कोरोनाच्या काळातही तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्य पुढे नेत वेळोवेळी वरिष्ठांच्या माध्यामातून मार्गदर्शन घेवून मुख्याध्यापकांना माहिती दिली. मुख्याध्यापक संघट एकसंघ करण्यासाठी तसेच गटसाधन केंद व शाळा यांच्यात समन्वय साधन्यासाठी वेळावेळी प्रयत्न केले असल्याचे सांगितले.
यानंतर महाराष्ट्र राज्य मुख्यध्यापक संघाच्या राज्यध्यक्षपदी जे.के.पाटील, राज्यकार्यकारणी सदऱ्य पदी जी.आर.चौधरी, नाशिक विभागीय सचिव पदी गोपाळ पाटील यांची विनविरोध निवड तसेच तालुक्यातील सेवानिवृत्त व नवनियुक्त मुख्याध्यापकांचा देखील यावेळी प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात सुनिल भिरूड म्हणाले की, संघटने मधे निस्वार्थ काम करा नक्कीच तुमची निवड वरिल पदांसाठी होत असते. यासाठी कुणाच्याही शिफारशीची गरज भासतन नाही. आपल्या जिल्ह्यातील काम व ज्ञानाच्या आधारावर जे.के. पाटील सर यांची निवड राज्यध्यक्षपदी करण्यात आली आहे. सर्वजण एकत्र राहण्याचा प्रयत्न करा. मुख्याध्यापक हे पद काटेरी असुन यासाठी सर्व नियमांचे व कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. यामुळे तु्म्हाला अडचणी येणार नाही. तसेच प्रत्येक पालकांशी व शिक्षकांशी सलोख्याचे नाते असावे. यामुळे प्रशासकीय कामकाजात अडचणी येत नाही.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.संजू भटकर यांनी तर आभार नितीन भालेराव यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष ए.ए. जगताप, सचिव एन.एस.भालेराव, सदस्ये एन.बी.किरंगे, ए.आर.गुरचळ, एन.आर.सय्यद,आय.वाय. शेख, एस.बी.लोखंडे, एस.एस.पाटील, दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयाती सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक भारावले
नोकरीच्या ठिकाणावरून सेवानिवृत्त होत असताना खुप आनंद होतो. यावेळी यथोचित सत्कार समारंभ देखील होत असतो. मात्र सेवानिवृत्ती नंतर शाळेच्या दैनंदिन कामकाजातून बाहेर फेकले जात असतो. यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र २०१६ नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाने सन्मानपत्र देवून सत्कार केल्याने व कार्यक्रमाला बोलविल्याने सेविनिवृत्त मुख्याध्यापक भारावले होते.


