संविधान आर्मीतर्फ़े विविध मागण्यांसाठी आक्रोश अर्धनग्न मोर्चा : आंदोलकांना अटक करून कारवाई; भर पावसात जोरदार घोषणाबाजी :


भुसावळ – दिपनगर येथील विद्युत औष्णिक ६६० मेगावॅट प्रकल्पात संविधान आर्मीसह आज ६ रोजी विविध १० संघटनांतर्पेâ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढल्यानंतर अर्धनग्न मोर्चास सुरुवात झाली. यावेळी गांधी पुतळ्याजवळ मोर्चा पोहचल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. प्रसंगी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले व अटक करून कारवाई केली. या आंदोलनात असंख्य अस्थाई कामगार सहभागी झाले होते.
इंडवेल प्रा. लि. या वंâपनीतील ६०० कामगारांचे एक ते चार महिन्याचे वेतन रखडलेले असल्याने तसेच वेतनासमवेतच्या इतर सवलतीसुद्धा मिळत नाहीत. थकीत वेतन तातडीने मिळालेच पाहिजे. तालुक्यातील व परिसरातील स्थानिक बेरोजगारांना काम मिळाले पाहिजे, शहरात घाणीचे साम्राज्य वाढले, रस्त्यांची दूरावस्था झाली. कुठलेही नियोजन नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. शहरात डेंग्युमुळे दोन तरुणांना प्राण गमवावे लागले. याला जबाबदार कोण? शहरातील रस्ते, पाणी, वीजबिलमध्ये दरवाढ, नागरी सुविधांचा अभाव, रेल्वे विभागातील पुर्वीचे अतिक्रमीत झोपडी व टपरी धारक यांना जागा मिळण्यासाठी अडथळा, महात्मा गांधी विद्यालयातील मुख्याध्यापकांना होणार छळ थांबवावा, शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करून पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस दरवाढ रद्द करा, अशा विविध मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. विविध दहा संघटनेमार्पâत काढण्यात आलेल्या मोर्चात याप्रसंगी कामगार वर्गातून तीव्र पडसाद उमटलेले दिसून आले. येथील कामगारांमध्ये वंâपनीच्या विरोधात प्रचंड असंतोष वाढला होता.


संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर सेना प्रदेश महामंत्री जगन सोनवणे व नगरसेविका पुष्पा सोनवणे यांच्या नेतृत्वात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. आक्रोश अर्धनग्न मोर्चा बाजारपेठ पोलिस स्टेशन, नगरपालिका दवाखाना, शहर पोलिस स्टेशनमार्गे थेट महात्मागांधी पुतळ्यासमोर कामगारांचा मोर्चा धडकला. यावेळी येथे मोर्चातील आंदोलक व कामगारांनी जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी जोरदार सुरू असलेल्या पावसातही आंदोलन सुरू होते. या दरम्यान, नियमांचे उल्लंघन मोर्चास परवानगी नसतांनाही मोर्चा काढल्याने आंदोलक कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
आंदोलनात संविधान आर्मीचे जगन सोनवणे, नगरसेविका पुष्पा सोनवणे, पीआरपी उत्तर महाराष्ट्रप्रमुख राकेश बग्गन, पीआरपी अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाप्रमुख आरीफ शेख, छत्रपती सेना जिल्हाप्रमुख गोपी साळी, राष्ट्रीय मजदूर सेना तालुकाप्रमुख सुनील ठावूâर, जिल्हाध्यक्ष हरीष सुरवाडे, जिल्हाउपाध्यक्ष गजानन चNहाटे, जिल्हामहासचिव चंदू पहिलवान, भारतीय ओंडबस् क्रांती जिल्हाउपाध्यक्ष जयराज भार्गव, टीपू सुलतानसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, संविधान आर्मी युवा जिल्हाप्रमुख राहुल साळुंखे, विशाल पवार, श्रीराम राठोड, छोटु सोनवणे, हिरलाल सोनवणे, मनोहर पवार, गोलू पवार, गिता पाटील, विनयकुमार, अरुणकुमार, आनंदा पवार, दिनेश शहा, बंटीकुमार, निर्मल राठोड, भैय्याराम शहा, ब्रीज किसन शहा, तन्वीर यादव, सुनील चव्हाण, पवन कुमार, ब्रीजेश चव्हाण, सीताराम मंडल, बालवीन बलवीर, दिपलेश सिंग, खानसित अन्सारी, दीपक ब्रीन, धनंजय प्रसाद, आदींसह शेकडो कामगार आंदोलनात उपस्थित होते.