अमळनेर – दहीवद ता.अमळनेर येथे आज ता.६ रोजी सायंकाळी झालेल्या पावसाने वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली.
येथील रहिवासी आबा हरी माळी यांच्या मालकीचा बैल आज
पोळयाच्या सण असल्याने त्यांनी सकाळी चारा वगैरे खाऊ घालून दुपारी आपल्या घरी बैल पोळा असल्याने पूजनासाठी आणला.यानंतर त्यांनी दहीवद टाकरखेड़ा रस्त्यावर असलेल्या शेतात निंबाच्या झाडाला बैल बांधले आणि चारा टाकला मात्र सायंकाळी पाच वाजता झालेल्या पावसाने जोरात विज कडाडली यात एक बैल थोड्या अंतरावर होता. यात एका बैलावर विज पडल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थली पशुवैद्यकीय अधिकारी मुकेश पाटील ,तलाठी एस.बी.पंचभाई कोतवाल प्रदीप देसले यांनी जावुन पंचनामा केला.पोळयाच्या दिवशी शेतकरी राजावर आसमानी संकट आल्याने त्याला अश्रु अनावर झाले होते. सदयस्थितित सुरु असलेल्या हंगामात बैलाचे विज पडून ठार झाल्याने आबा माळी यांचे सुमारे पंचेचाळीस हजाराचे नुकसान झाले आहे.



